Suzlon Share Price | शेअरची किंमत 37 रुपये, ऑर्डर मिळताच सुझलॉन शेअर्स रॉकेट वेगात, या वर्षी 248% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.32 टक्के वाढीसह 37.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरात राज्यातील केपी ग्रुपने 193.2 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर दिली आहे. यापूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनीला एका आघाडीच्या जागतिक युटिलिटी कंपनीने 100.8 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची ऑर्डर दिली होती.
या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनीला नवीन उत्पादन हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवरसह 3.15 मेगावॅट क्षमतेचे 32 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 37.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गुजरात राज्यातील केपी ग्रुपने सुझलॉन एनर्जी कंपनीला 193.2 मेगावॅट क्षमतेची पुनरावृत्ती ऑर्डर दिल्याने कंपनीच्या शेअरमध्ये नीचांक किंमत पातळीवरून सुधारणा पाहायला मिळाली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी या ऑर्डर अंतर्गत 2.1 मेगावॅट क्षमतेच्या 92 पवन टर्बाइनचा पुरवठा करणार आहे. यासह कंपनी एकूण 293.32 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यात चाचरा आणि विलायत या ठिकाणी उभारणार आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 13.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे सीएफओ हिमांशु मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुझलॉन एनर्जी कंपनीकडे सध्या 1.6 GW क्षमतेच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.
मागील सहा महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 163.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 245.33 टक्के वाढली आहे. या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 44 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6.96 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,962 23 कोटी रुपये आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने वार्षिक नफ्यात 45 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. या तिमाहीत कंपनीने 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीने 11417 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 1430 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price NSE 22 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News