23 November 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Tiger Logistics Share Price | 3 वर्षात दिला 1500% परतावा, स्टॉक स्प्लिटच्या बातमीने हा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी

Tiger Logistics Share Price

Tiger Logistics Share Price | टायगर लॉजिस्टिक इंडिया या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अजूनही या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत, यामुळे स्टॉक तेजीचा कल दर्शवत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के नफा मिळवून दिला आहे.

मागील तीन महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 40 टक्के वाढले आहे. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी टायगर लॉजिस्टिक इंडिया स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 629.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील एका वर्षात टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 1500 टक्के मजबूत झाली आहे. अवघ्या 3 वर्षांत टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 55 रुपयेवरून वाढून 600 रुपये किमतीवर पोहचली आहे. टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार 9 जानेवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेऊ शकते.

2021 मध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. 2015 साली या कंपनीने दोन शेअर्सवर 3 बोनस शेअर्स वाटप केले होते. टायगर लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः लॉजिस्टिक्स संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी माल वाहतुकीशी संबंधित सर्व कामे हाताळते. सध्या टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनी आपल्या शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकदारांना शेअर परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता यावे म्हणून स्टॉक स्प्लिट करण्याचा विचार करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tiger Logistics Share Price NSE 22 December 2023.

हॅशटॅग्स

Tiger Logistics Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x