19 April 2025 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 214% परतावा

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.49 टक्क्यांच्या वाढीसह 1,341 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत मिळत आहेत.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला नुकताच एका मोठ्या सोलर प्लांटचे काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या KPIG Energia Private Limited कंपनीने ‘कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर’ सेगमेंट अंतर्गत 1.80 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे.

या नवीन काँट्रॅक्टमुळे केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या CPP विभागातील सौरऊर्जा प्रकल्पांची एकूण ऑर्डर 151+ MW च्या पार गेली आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 1.10 टक्के घसरणीसह 1,327.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

22 डिसेंबर 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 18 डिसेंबर 2023 रोजी ते 21 डिसेंबर 2023 रोजी दरम्यानच्या इश्यू संदर्भात पात्र QIB ला प्रत्येकी 1,183 रुपये किमतीनुसार 25,35,925 इक्विटी शेअर्स वाटप करण्यासाठी संचालक मंडळाची मंजुरी मिळवली होती. QIP नुसार, शेअर्सच्या इश्यूचा एकूण आकार 300 कोटी रुपये होता. यात प्रति इक्विटी शेअर 1,173 रुपये प्रीमियम सामील होता. शेअर्स वाटपानंतर केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवल 40.18 कोटी रुपयेवर पोहचले आहे, ज्यामध्ये आता एकूण 4,01,88,405 इक्विटी शेअर्स आहेत.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही कालावधीत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 215.07 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, ज्यात वार्षिक आधारे 34.55 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

याच तिमाहीत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 72.04 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला आहे. तर याच तिमाहीत कंपनीने 31.744 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. वार्षिक आधारे केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या एकूण PAT मध्ये 64.22 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

मागील तीन वर्षांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3,400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 200 टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये, FII ने केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीमधील आपला गुंतवणूक वाटा 4.24 टक्के वाढवला आहे.

KPI ग्रीन एनर्जी ही कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी स्वतंत्र उर्जा उत्पादक म्हणून आणि कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर ग्राहकांना ‘Solarism’ या ब्रँड नावाखाली सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मागील तिमाहीच्या तुलनेत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकांनी आपल्या शेअर होल्डिंगमध्ये 1.85 टक्के वाढ केली आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचा लाभांश उत्पन्न प्रमाण 0.12 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 26 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या