22 November 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Azad Engineering IPO | अवघ्या 9 महिन्यांत सचिन तेंडुलकरला IPO शेअर 5 कोटी रुपयांवर देईल 22.96 कोटी रुपये परतावा

Azad Engineering IPO

Azad Engineering IPO | हैदराबाद स्थित आझाद इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स पुढील आठवड्यात शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. आझाद इंजिनीअरिंग कंपनीमध्ये सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी 5 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक केली होती. जी आता वाढून 23 कोटी झाली आहे. IPO GMP

अवघ्या 9 महिन्यांत सचिन तेंडुलकरची गुंतवणूक IPO च्या माध्यमातून अनेक पट वाढली आहे. आझाद इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सच्या 524 रुपये या अप्पर इश्यू प्राईसचा विचार केला तर सचिन तेंडुलकर यांच्या 5 कोटी रुपये गुंतवणुकीचे मूल्य 22.96 कोटी रुपये होईल. म्हणजेच त्यांना एकूण 360 टक्के नफा मिळेल.

ग्रे मार्केटमध्ये आझाद इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स IPO किमतीच्या तुलनेत 65 टक्के अधिक प्रीमियमसह ट्रेड करत आहेत. 6 मार्च 2026 रोजी सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनीअरिंग कंपनीमध्ये 5 कोटी रुपये लावले होते. ही कंपनी मुख्यतः स्वच्छ ऊर्जा, एरोस्पेस, संरक्षण आणि तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक OEMs कंपनीना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

मागील आठवड्यात शुक्रवारी आझाद इंजिनीअरिंग कंपनीच्या 740 कोटी रुपये मूल्याच्या IPO चे सबस्क्रिप्शन बंद झाले आहे. आपल्या IPO च्या माध्यमातून आझाद इंजिनीअरिंग कंपनीने 240 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले आहे. आणि 500 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स OFS अंतर्गत खुल्या बाजारात विकले आहेत. OFS अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक राकेश चोपदार, गुंतवणूकदार पिरामल स्ट्रक्चर्ड फंड आणि डीएमआय फायनान्स यांनी आपले शेअर्स खुल्या बाजारात विकले आहे.

आझाद इंजिनीअरिंग कंपनीमध्ये सचिन तेंडुलकर शिवाय पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देखील गुंतवणूक केली होती. त्यांच्या 1 कोटी रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.3 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच त्यांना अल्पावधीत 130 टक्के नफा मिळाला आहे.

आझाद इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 499-524 रुपये निश्चित केली होती. एका लॉटमध्ये कंपनीने 28 शेअर्स ठेवले होते. कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के कोटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवला होता. तर 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला होता. आणि उर्वरित 15 टक्के कोटा कंपनीने गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला होता.

आझाद इंजिनिअरिंग कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 31 टक्के वाढीसह 261 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 71 टक्के घसरला आणि 8.4 कोटी रुपयेवर आला होता. आझाद इंजिनीअरिंग कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2021 आणि आर्थिक वर्ष 2023 दरम्यान 43 टक्के CAGR ने वाढला होता. तर कंपनीचा PAT मार्जिन याच कालावधीत 49 टक्के CAGR ने वाढला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Azad Engineering IPO GMP Today 26 December 2023.

हॅशटॅग्स

Azad Engineering IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x