23 November 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

CESC Share Price | शेअरची किंमत 123 रुपये, तुम्हाला अल्पावधीत देईल 26 टक्के परतावा

CESC Share Price

CESC Share Price | 2023 या वर्षात पॉवर सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त वाढले आहे. विजेच्या मागणीत होणारी सतत वाढ आणि वीज वितरण कंपन्यांची मजबूत कामगिरी यामुळे वीज कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. वीज निर्मिती क्षेत्रातील वाढ पाहून ब्रोकरेज फर्मने सीईएससी लिमिटेड या स्मॉलकॅप पॉवर जनरेशन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.48 टक्के वाढीसह 123.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअरखान फर्मने सीईएससी लिमिटेड या वीज निर्मिती कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. विजेच्या मागणीत होणारी प्रचंड वाढ पाहून तज्ञ पॉवर स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. सीईएससी लिमिटेड या कंपनीच्या कमाईमध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे.

याशिवाय सीईएससी लिमिटेड कंपनी आपल्या अक्षय ऊर्जा व्यवसायात देखील वाढ करत आहे. पुढील 4-5 वर्षांत सीईएससी लिमिटेड कंपनी 3GW च्या RE साठी 12-13 हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणुक करण्याची योजना आखत आहे.

सीईएससी लिमिटेड कंपनी राजस्थान, मालेगाव आणि चंदीगडमध्ये वीज वितरण व्यवसाय विस्तार करण्याची तयारी करत आहे. ब्रोकरेजने फर्मने सीईएससी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 150 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ही टार्गेट प्राइस सध्याच्या किमतीपेक्षा 26 टक्के अधिक आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये ब्रोकरेज फर्मने सीईएससी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 105 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली होती.

सीईएससी लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 128 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 62 रुपये होती. सीईएससी लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15800 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत सीईएससी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 31 टक्क्यांनी वाढली आहे. 2023 या वर्षात सीईएससी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CESC Share Price NSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

#CESC Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x