25 November 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Penny Stocks | कुबेर कृपा होईल! शेअरची किंमत 4 रुपये, मागील 5 दिवसात दिला 38 टक्के परतावा, खरेदी करणार?

Penny Stocks

Penny Stocks | शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. केले. सध्या या कंपनीचे शेअर्स 4.50 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. Shah Metacorp Share Price

मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.57 टक्के घसरणीसह 4.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील पाच दिवसात शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.40 रुपयेवरून वाढून 4.80 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील आठवड्यात बुधवार आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 4.60 रुपये आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

मागील एका महिन्यात शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

शाह मेटाकॉर्प ही कंपनी स्टील क्षेत्रात व्यवसाय करणारी दिग्गज कंपनी आहे. ही कंपनी लोहापासून ते स्टेनलेस स्क्रॅप आणि ड्रायव्हर्स स्ट्रक्चर असे सर्व उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनी स्टेनलेस स्टील आणि माईल्ड स्टीलचा व्यवसाय देखील करते. शाह मेटाकॉर्प ही कंपनी भारतातील मूल्यवर्धित पोलाद उत्पादने घेणारी अग्रणी कंपनी मानली जाते.

शाह मेटा कॉर्पोरेशन कंपनीने 1990 च्या दशकात मेटल ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला होता. या वर्षी जुलै 2023 मध्ये शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीला इटली आणि इतर युरोपीय देशांतील ग्राहकाकडून 40 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. नुकताच शाह मेटाकॉर्प लिमिटेड कंपनीला पोलाद आणि मिश्र धातुचे निर्यात करण्याचा परवाना देखील मिळाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy Shah Metacorp Share Price NSE Live 27 December 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(545)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x