22 November 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

HAL Share Price | भरवशाचा एचएएल शेअर खरेदी करा, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, खरेदीनंतर संयम मालामाल करेल

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.81 लाख कोटी रुपये आहे. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2849 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1150 रुपये होती.

मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 46 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 2,805 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2023 या वर्षात एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 113 टक्के नफा कमावून दिला आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 312 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरुन हा स्टॉक 800 टक्के वाढला आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणारी अग्रणी कंपनी मानली जाते. जर एचएएल स्टॉकने 2800 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर अल्पावधीत 3000 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

नुकताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय संरक्षण अधिग्रहण परिषदेने 12 Su-MKI विमाने बनवण्याची ऑर्डर दिली आहे. यासह डॉर्नियर विमानाच्या अपग्रेडेशन संबंधित कंत्राट देखील एचएएल कंपनीला देण्यात आले आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 29 डिसेंबर 2023 पासून विभागले जातील. या कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. तर 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 27 December 2023.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x