15 November 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON
x

Suzlon Share Price | 38 रुपयाच्या सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये आता गुंतवणूक केल्यास फायदा होईल? ऑर्डरबुक मजबूत होतेय

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 250 टक्के वाढली आहे. याकाळात शेअरची किंमत 10 रुपयेवरून वाढून 37.15 रुपये किमतीवर गेली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 37.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअर बाजारातील अनेक गुंतवणूक सल्लागारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 100 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.37 टक्के वाढीसह 38.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील दोन किंवा तीन वर्षासाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला महिंद्रा कंपनीकडून एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. पुणेस्थित महिंद्रा सस्टेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला 100.8 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर दिली आहे.

या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनीला 2.1 मेगावॅट क्षमतेच्या 48 विंड टर्बाइनचा पुरवठा करायचा आहे. हा पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार असून यातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना दिली जाणार आहे.

सुझलॉन कंपनीला या प्रकल्पाची पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वित करण्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सुझलॉन एनर्जी कंपनीला हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ऑपरेशन आणि देखभालीचे काम देखील करायचे आहे. या आधी सुझलॉन एनर्जी कंपनीला केपी समूहाने गुजरातमध्ये 193.2 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याची ऑर्डर दिली होती. KP समूह सुझलॉन एनर्जी कंपनीच्या साहाय्याने 193.2 MW क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करणार आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह 37.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 152 टक्के मजबूत झाली आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स तब्बल 250 टक्के मजबूत झाले आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 270 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 28 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x