24 November 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Stocks To Buy | 6 महिन्यांत 100% परतावा देणारा शेअर खरेदीचा SBI सिक्युरिटीज फर्मचा सल्ला, टार्गेट प्राईस किती?

Stocks To Buy

Stocks To Buy | 2023 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता काही दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. 2024 मध्ये भारतीय शेअर बाजाराची गती अशीच वाढत राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या जर तुम्ही 2024 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही झेन टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर खरेदी करू शकतात. Zen Technologies Share Price

एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. तज्ञांनी नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 0.51 टक्के घसरणीसह 806 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

SBI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी पुढील 12 महिन्यांच्या कालावधीसाठी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 950 रुपये टारगेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1400 कोटी रुपये आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3.5 पट वाढला आहे.

झेन टेक्नॉलॉजी या कंपनीची आर्थिक स्थिती खूप मजबूत आहे. या कंपनीचे EBITDA मार्जिन 30 टक्केवर पोहचले आहे. कंपनीच्या नियोजित भांडवलावर मिळणारा परतावा दर 48 टक्के आहे. 2023 मध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीची टॉपलाइन 219 कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 2025 मध्ये या कंपनीची कमाई मल्टिपल 32 वर जाण्याची शक्यता आहे. आणि वर्ष 2026 मध्ये कंपनीचा कमाई मल्टिपल 25 वर जाऊ शकतो.

2023 या वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 809.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,802.96 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 28 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x