12 December 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Multibagger Stocks | या शेअरने फक्त 88 हजार रुपये गुंतवणुकीवर दिला 1 कोटी रुपये परतावा, ब्रोकरेजने अजून तेजीचे संकेत दिले

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीत देखील मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 11 महिन्यांत सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. एवढेच नाही तर अवघ्या 11 वर्षांत फक्त 88 हजार रुपये गुंतवणुकीवर सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलने सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के वाढीसह 740.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

10 ऑगस्ट 2012 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 6.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 710 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जर तुम्ही 11 वर्षांपूर्वी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्समध्ये 88000 रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपये झाले असते. 2 जानेवारी 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 276.88 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर पोहचला होता. मात्र मागील 11 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स तब्बल 190 टक्क्यांनी वाढले आहेत.

14 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 803.55 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. मात्र स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली झाली आणि शेअर्स 8 टक्के घसरले होते. मागील काही तिमाहीत सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे. ब्रोकरेज फर्म आयडीबीआय कॅपिटल फर्मच्या मते सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्स दीर्घकालीन वाढ पाहायला मिळू शकते.

आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2027 पर्यंत सॉफ्टवेअर विक्रीतून येणारे आंतरराष्ट्रीय सेवा उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे. काही तज्ञांचा अंदाज आहे की, हे लक्ष्य आर्थिक वर्ष 2026 पूर्वी साध्य होईल. आर्थिक वर्ष 2023 ते 2026 दरम्यान सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचा महसूल 23 टक्के चक्रवाढ दराने वाढू शकतो. आणि कंपनीचा निव्वळ नफा 24 टक्के चक्रवाढ दराने वाढू शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून तज्ञांनी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरवर 915 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks for investment on 29 December 2023

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(457)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x