14 December 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 16 रुपये, 1 दिवसात 21% परतावा दिला, पेनी शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | 2023 या वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढीसह 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने अवघ्या दोन वर्षांत एक नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 10 जानेवारी 2022 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढीसह 16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.70 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2023 या वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 9 महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 175 टक्के नफा कमावून दिला आहे.

31 मार्च 2023 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 5.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 16.02 रुपये किमतीवर पोहचला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात हा स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे.

कंपनीच्या प्रवर्तकानी निधी उभारणीसाठी चर्चा सुरू केली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने माहिती दिली होती की, कंपनीच्या प्रवर्तकांनी डिसेंबर 2023 तिमाहीत 2000 कोटी रुपये भांडवल जमा करण्याची वचनबद्धता जाहीर केली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीवर मोठ्या प्रमाणात बाह्य कर्ज निर्माण झाले आहे. या वर्षी सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीने भारतीय दूरसंचार विभागाला 1701 कोटी रुपये थकबाकी अदा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 30 December 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x