19 April 2025 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Suzlon Share Price | 38 रुपयांच्या सुझलॉन शेअर्सबाबत तज्ज्ञ का उत्साही आहेत? नवीन वर्षातील खरेदी श्रीमंतीच्या दिशेने जाईल?

Suzlon Share Price

Suzlon Share Price| सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच टक्के वाढीसह 38.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52030 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44 रुपये होत. तर नीचांक किंमत पातळी 7 रुपये होती.

मागील 5 दिवसांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्के नफा मिळवून दिला आहे. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.13 टक्के वाढीसह 38.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 270 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 282 टक्के वाढवले आहेत. मार्च 2020 मध्ये कोरोना संकटाच्या काळात सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.50 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या नीचांक किमतीच्या तुलनेत सुझलॉन एनर्जी स्टॉकने लोकांना 2500 टक्के नफा कमावून दिला आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला नवीन दोन ऑर्डर मिळाल्या आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीला महिंद्र सस्टेन कंपनी आणि नॉर्डिक एनर्जी कंपनीकडून प्रत्येकी 101 मेगावॅट क्षमतेच्या दोन पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला महिंद्रा सस्टेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 100.8 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला या ऑर्डर अंतर्गत 48 युनिट टर्बाइन पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता 2.1 मेगावॅट असेल.

सुझलॉन एनर्जी द्वारे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना पुरवठा केली जाईल. सुझलॉन एनर्जी कंपनी या ऑर्डर अंतर्गत पुरवठा, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगचे काम करणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी पवन ऊर्जा टर्बाइन प्रकल्प स्थापनेनंतर त्यांचे ऑपरेशन आणि देखभालीचे काम देखील करणार आहे.

याशिवाय सुझलॉन एनर्जी कंपनीला नॉर्डिक एनर्जी कंपनीने 3 मेगावॅट सीरिज टर्बाइनचे 100.8 मेगावॅट क्षमतेचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन कंपनी 3.15 मेगावॅट क्षमतेचे 32 युनिट टर्बाइनचा पुरवणार अबे. हा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प कर्नाटक राज्यात उभारला जाणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 30 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या