BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर सेव्ह करा, वेळीच फायदा घ्या, ऑर्डरबुक मजबूत
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस कंपनीने नुकताच 1.34 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्पर्श केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी बीईएल स्टॉक 0.44 टक्के वाढीसह 183.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
नुकताच या कंपनीला 678 कोटी रुपये मूल्याच्या दोन ऑर्डर मिळाल्यामुळे बीईएल स्टॉक तेजीत आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने बीईएल कंपनीला यूपी डायल 112 या प्रोजेक्टसाठी 445 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. यासह बीईएल कंपनीला कम्युनिकेशन डिस्प्ले युनिट्स, थर्मल इमेजिंग कॅमेरे आणि इतर सुटे भाग आणि सेवांसाठी 233 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स ही नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. डायल 112 प्रकल्पांतर्गत बीईएल कंपनी उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेल्या 445 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर अंतर्गत अत्याधुनिक हार्डवेअर, AI आधारित सॉफ्टवेअर टूल्स आणि सायबर सुरक्षा सेवा प्रदान करणार आहे. मागील आठवड्यात, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला गोवा शिपयार्ड आणि गार्डन रीच शिपबिल्डर कंपनीने 2673 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती.
मागील 5 दिवसांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. तर मागील 6 महिन्यांत बीईएल स्टॉक तब्बल 46 टक्के मजबूत झाला आहे. अवघ्या सहा महिन्यात बीईएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 121 रुपयेवरून वाढून 183 रुपये किमतीवर पोहचली आहे. 2023 यावर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 100 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 84 टक्के वाढले आहेत.
8 मे 2020 रोजी बीईएल स्टॉक 20 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर या किमतीच्या तुलनेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तब्बल 815 टक्के मजबूत वाढले आहेत. 1 जानेवारी 1999 रोजी बीईएल कंपनीचे शेअर्स 22 पैशांवर ट्रेड करत होते, तर या किमतीच्या तुलनेत बीईएल स्टॉक आता 83400 टक्के मजबूत झाला आहे.
नुकताच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने 1701 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. तर गार्डन रीच शिप बिल्डर अँड इंजिनिअर कंपनीने या कंपनीला 972 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, बीईएल कंपनीला कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीकडून विविध प्रकारच्या उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी 2118.57 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. यात मुख्यतः सेन्सर, शस्त्र उपकरणे, अग्निशामक यंत्रणा आणि दळणवळणाची उपकरणे असे साधन आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 71000 कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात बीईएल कंपनीला भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने विविध ऑर्डर दिल्या आहेत. या ऑर्डरचे एकूण मूल्य 30,000 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEL Share Price NSE Live 30 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा