25 November 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

HPL Share Price | पैशाने पैसा वाढवा! अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा, या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर

HPL Share Price

HPL Share Price | 2023 या वाढत भारतीय शेअर बाजाराने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता ब्रोकरेजने नवीन वर्षात 12 महिन्यांसाठी एचपीएल इलेक्ट्रिक या स्मॉलकॅप कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचपीएल इलेक्ट्रिक या कंपनीची स्थापना 1993 साली झाली होती. ही भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक उपकरणे उत्पादन करणारी कंपनी मानली जाते.

एचपीएल इलेक्ट्रिक ही कंपनी मीटर, मॉड्युलर स्विच, स्विच गियर आणि वायर आणि केबल्स बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीकडे 900 पेक्षा जास्त वितरक आणि 75000 पेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांचे नेटवर्क आहे. यासह कंपनीकडे एकूण 7 उत्पादन युनिट देखील आहेत. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी एचपीएल इलेक्ट्रिक स्टॉक 5.84 टक्के वाढीसह 248.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ICICI Direct ने आपल्या प्रसिद्ध केलेला अहवालात माहिती दिली आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये HPL इलेक्ट्रिक कंपनीने 53 टक्के महसूल मीटरिंग व्यवसायातून संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2020 ते 2023 दरम्यान कंपनीचा महसूल सरासरी 8.9 टक्के CAGR दराने वाढला आहे. कंपनीचा EBITDA दर वाढ 7.9 टक्के असून निव्वळ नफ्यातील सरासरी दर वाढ 10.9 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एचपीएल इलेक्ट्रिक कंपनीने 3.9 पट वाढीसह 30.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

स्मार्ट मीटरिंगची वाढती मागणी एचपीएल इलेक्ट्रिक कंपनीला अधिक फायदा देऊ शकते. आर्थिक वर्ष 2023-26 दरम्यान एचपीएल इलेक्ट्रिक कंपनीचा महसूल 19.7 टक्के CAGR वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तज्ञांनी एचपीएल इलेक्ट्रिक स्टॉक 6-12 महिन्यांच्या कालावधीसाठी खरेदीची शिफारस केली आहे. यावर तज्ञांनी 305 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली, जी सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे.

एचपीएल इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 269 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के आणि 2023 या वर्षात 150 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HPL Share Price NSE Live 30 December 2023.

हॅशटॅग्स

HPL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x