22 November 2024 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Suzlon Share Price | किंमत 38 रुपये, 1 वर्षात 256% परतावा देणारा सुझलॉन शेअर तुफान तेजीत येणार, नेमकं कारण काय?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, आणि भारतीय शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला अपर्वा एनर्जी कंपनीने 300 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. Suzlon Energy Share Price

पवन आणि सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने देखील या कंपनीचे भाग भांडवल धारण केले आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला जो नवीन काँट्रॅक्ट मिळाला आहे, त्या अंतर्गत कंपनी कर्नाटक राज्यात 300 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. यात कंपनी प्रत्येकी 3 मेगावॅट क्षमतेच्या 100 पवन टर्बाइनचा पुरवठा करणार आहे. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.26 टक्के घसरणीसह 38.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52030 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7 रुपये होती मागील 5 दिवसांत, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने 14.75 रुपये किमतीच्या तुलनेत 160 टक्के वाढ नोंदवली आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 282 टक्के नफा कमावून दिला आहे. कोरोना काळात सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.50 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीच्या तुलनेत शेअर आता 2500 टक्के वाढला आहे. नुकताच महिंद्र सस्टेन आणि नॉर्डिक एनर्जी कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला प्रत्येकी 101 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचे दोन कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला महिंद्रा सस्टेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 100.8 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर दिली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला 48 युनिट टर्बाइन पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रोजेक्टची क्षमता 2.1 मेगावॅट असेल. आणि हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाईल. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महाराष्ट्रात व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना पुरवली जाईल. दिली.

याशिवाय सुझलॉन एनर्जी कंपनीला नॉर्डिक एनर्जी कंपनीने 3 मेगावॅट सीरिज टर्बाइनचा पुरवठा करण्याची 100.8 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी प्रत्येकी 3.15 मेगावॅट क्षमतेचे 32 युनिट टर्बाइन पुरवणार आहे. या प्रकल्पाची उभारणी कर्नाटक राज्यात केली जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 01 January 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x