23 November 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

L&T Share Price | भरवशाचा एल अँड टी शेअर खरेदी करणार? कंपनीला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली, एंट्री घेणार?

L&T Share Price

L&T Share Price | एल अँड टी कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आता या कंपनीला बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पा अंतर्गत एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कर्नाटकच्या रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणजेच KRIDE कंपनीने 30 डिसेंबर 2023 रोजी एल अँड टी कंपनीला कंत्राट स्वीकृती पत्र जारी केले आहे. या ऑर्डर अंतर्गत एल अँड टी कंपनीला बंगलोर उपनगरीय रेल्वे प्रकल्पाच्या 46 किमी लांबीच्या कांका लाईन कॉरिडॉर-4 मधील नागरी काम पूर्ण करायचे आहे.

या प्रकल्पाचे एकूण मुल्य 1040 कोटी रुपये आहे. या प्रकल्पा अंतर्गत एल अँड टी कंपनी 8.9 किलोमीटर लांबीचे व्हायाडक्टचे डिझाइन आणि बांधकाम संबंधित काम हाती घेणार आहे. हा प्रकल्प ईपीसी अर्थात अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम तत्वावर पूर्ण केला जाईल. आज 1 जानेवारी 2024 रोजी एल अँड टी स्टॉक 0.29 टक्के घसरणीसह 3,515.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये बंगलोर उपनगरीय रेल्वे कामाच्या निविदेसाठी एल अँड टी कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती. मात्र, रेल्वे विभागाने जागा हस्तांतरित करण्यास उशीर केला. आता KRIDE ने एल अँड टी कंपनीला वर्क ऑर्डर जारी केली आहे. KRIDE ला हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कनका लाईनसाठी याच जानेवारी 2023 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या.

या प्रकल्पाचे एकूण मूल्य 1040.51 कोटी रुपये आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे बंगलोर उपनगरीय प्रकल्पाच्या कॉरिडॉर-4 साठी जमीन लवकरच जमीन हस्तांतरित करेल. या प्रकल्पाचे विशेष महत्व म्हणजे या कॉरिडॉर 1 आणि कॉरिडॉर 2 मध्ये डबल डेक व्हायाडक्ट बांधला जाणार आहे.

या प्रकल्पाची एकूण लांबी 149 किलोमीटर असेल. ऑक्टोबर 2020 मध्ये भारत सरकारने 149 किलोमीटर लांबीचा उपनगरीय रेल्वे प्रकल्प मंजूर केला होता.या अंतर्गत एकूण 4 कॉरिडॉर बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली. आणि हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान 6 वर्षे लागू शकतात. कर्नाटक राज्य सरकारने हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी 2028 ही डेडलाइन निश्चित केली आहे. सध्या या प्रकल्पाचे 25 किमी लांबीच्या कॉरिडॉर 2 प्रकल्पाचे काम एल अँड टी कंपनीने सुरू केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE Live 01 January 2024.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x