22 November 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Shakti Pumps Share Price | अल्पावधीत 74% परतावा देणारा शक्ती पंप्स शेअर तेजीत, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली

Shakti Pumps Share Price

Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 1034 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1880 कोटी रुपये आहे. शक्ती पंप इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 12 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1224 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 388 रुपये होती.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 74 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 1,035.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 2403 कोटी रुपये आहे. परकीय तसेच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये आपले स्टेक वाढवले आहेत. नुकताच शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीने 258 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. या ऑर्डर अंतर्गत शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला 6408 पंप पुरवण्याचे काम देण्यात आले होते.

शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला हरियाणा राज्यातून 6408 सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली होती. कुसुम-3 योजनेंतर्गत मिळालेल्या या ऑर्डर्सचे एकूण मुल्य 258 कोटी रुपये आहे.

शक्ती पंप्स कंपनीने तीन मेगा प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. कंपनीला महाराष्ट्रातून 1603 कोटी रुपये मूल्याची 50000 पंप पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. ही कंपनी ऑन-ग्रीड पंप परिवर्तनावर देखील मोठे काम करत आहे. शक्ती पंप इंडिया लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये सेबीला कळवले होते की, कंपनीला PM कुसुम-3 योजनेअंतर्गत अजमेर विद्युत वितरण निगम लिमिटेड कंपनीने 150 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती.

ऑर्डर अंतर्गत शक्ती पंप्स कंपनीला ग्रीड कनेक्टेड सोलर वॉटर पंपिंग सिस्टिमचा पुरवठा करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच उत्तर प्रदेश राज्याच्या कृषी विभागाने देखील PM कुसुम-3 योजनेअंतर्गत शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला घटक B साठी 10000 पंप पुरवण्याची ऑर्डर दिली आहे. या कराराचे एकूण मूल्य 293 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shakti Pumps Share Price NSE Live 01 January 2024.

हॅशटॅग्स

Shakti Pumps Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x