21 April 2025 10:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुंबई सीएसएमटी पूल व तिवरे धरण दुर्घटनेत अनेकांचे बळी जाऊनही उद्धव ठाकरे फिरकलेच नाही

Shivsena, Udhav Thackeray, Minister Tanaji Sawant, Tiware Dam Incident, BJP, Devendra Fadanvis

चिपळूण : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ६ मुंबईकर मृत्युमुखी पडले, तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करून वेळ मारून घेतली होती. मुंबई महानगपालिकेत सत्तेत असलेली शिवसेना मुंबैकरांप्रती किती असंवेदनशील आहे हे तेव्हाच कळाले जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी किंवा बाधितांना भेटण्यासाठी फिरकले देखील नाही.

दरम्यान चिपळूण येथील तिवरे धरण ३ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.

मात्र मुंबई आणि कोकणातील लोकांचे कर्तेकरविते आम्हीच असा पारंपरिक दावा करणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत त्याचा प्रत्यय दोन्ही घटनांदरम्यान आला. लोकांना धर्माच्या राजकारणात बुडवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी विशेष विमानाने अयोध्येला जाणारे उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि कोकणातील माणसाची मतं हवी आहेत आणि सामान्यांच्या दैनंदिन गरजेच्या मूलभूत विषयात शिवसेना पक्षप्रमुखांना काहीच रस नाही असंच यामधून स्पष्ट होतं आहे. केवळ उद्धव ठाकरे यांनी आता मंत्री तानाजी सावंत यांना खेकड्याच्या विधानावरून झाडाले आहे अशा बातम्या पद्धतशीर पेरल्या आणि मी किती संवेदनशील आहे हे दाखवून देण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याच तानाजी सावंत आणि यापूर्वी महाराष्ट्राला भिकेला लावेन असं वक्तव्य केलं होतं, तरी देखील याच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद बहाल केलं. कदाचित ते विधान करताना तानाजी सावंत यांनी ‘माझ्याकडे प्रचंड पैसा आहे’ असं देखील म्हटलं होतं आणि तेच त्यांना भावलं असावं.

त्यामुळे कोसोदूर असणाऱ्या गुजरातमध्ये जाऊन ‘जय गुजरात’चा नारा देण्यासाठी आणि अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या शाखांचे उदघाटन करून घेण्याचे केविलवाणे प्रकार करण्यात सध्या उद्धव ठाकरे अधिक व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. मात्र ज्या सत्तेत ते विराजमान आहेत तेथील सरकारी अनास्थेमुळे घडलेल्या घटनांमुळे स्थानिक मरो वा जागो, त्यांना काहीच पडलेलं नाही असंच सध्या “विधानसभामय” वातावरण शिवसेनेत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या