23 November 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, शेअर्स उच्चांकी पातळीवर, वेळीच फायदा घेणार?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.7 टक्के वाढीसह 804 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची आतापर्यंतची सर्वांत उच्चांक किंमत आहे.

देशांतर्गत वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सची भारतीय बाजारपेठेतील एकूण विक्री डिसेंबर 2023 मध्ये चार टक्क्यांच्या वाढीसह 76,138 युनिट्सवर पोहचली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत 72997 वाहने विकली होती. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.54 टक्के वाढीसह 793.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील महिन्यात भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसह पॅसेंजर वाहनांची 43400 युनिट्सची एकूण विक्री झाली. डिसेंबर 2022 मध्ये हे प्रमाण 40043 युनिट्स होते, जे डिसेंबर 2023 मध्ये 9 टक्के वाढले आहे. मागील महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने भारतात 5,006 इलेक्ट्रिक प्रवासी वाहने विकली आहेत. डिसेंबर 2022 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने 3,868 युनिट्स वाहने विकले होते. म्हणजेच एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत 29 टक्के वाढ झाली आहे.

मागील सलग तीन वर्षात टाटा मोटर्स कंपनीने सर्वाधिक वाहन विक्री केली आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पैसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि हॅचबॅक सेगमेंटमधील शानदार कामगिरीमुळे टाटा मोटर्स कंपनीने 2023 मध्ये आपल्या विक्रीचा विक्रम मोडला आहे.

डिसेंबर 2023 मध्ये टाटा मोटर्स कंपनीची एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री 1 टक्के वाढीसह 34,180 युनिट्सवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच कालावधीत टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची विक्री 33,949 युनिट्सवर पोहोचली होती.

टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरचा आढावा घेणाऱ्या 35 तज्ञांपैकी 28 जणांनी टाटा मोटर्स स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तर तीन तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉक ‘होल्ड’ करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज शेअरखानने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहे.

शेअरखान फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 840 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या जॅग्वार अँड लँड रोव्हर विभाग आर्थिक वर्षाच्या उर्वरित भागात मजबूत कामगिरी करण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा मोटर्स स्टॉक गुंतवणुकदारांना आणखी परतावा देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x