18 November 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 5 रुपये! वेळीच खरेदी करा, मजबूत परतावा मिळण्याचे संकेत

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 टक्क्यांच्या वाढीसह 6.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी राजस्थान राज्यात नवीन जमीन संपादन करण्याची घोषणा केली आहे.

विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला कळवले आहे की, विकास लाइफकेअर कंपनीने RIICO राजस्थानमधील विद्यमान कारखान्यांना लागून 1800 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जमीन ताब्यात घेतली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 5.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास लाइफकेअर कंपनीला जमीन आणि इमारतीच्या संपादन तसेच विकास कामासाठी एकूण 3 कोटी रुपये खर्च आला आहे. कंपनीला आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जवळपास 23 कोटी रुपये खर्च येणार आहे. कंपनीचा व्यवसाय विस्तार पुढील तीन ते चार महिन्यांत केला जाईल.

या सर्व सकारात्मक बाबी विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी वाढवत आहेत. विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी परकी किंमत 2.66 रुपये होती. या तुलनेत विकास लाइफकेअर स्टॉक जवळपास 115 टक्के मजबूत झाला आहे.

मागील सहा महिन्यांत विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्क्यांनी वाढली आहे.

विकास लाइफकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 852.10 कोटी रुपये आहे. विकास लाइफकेअर ही कंपनी विविध क्षेत्रातील व्यवसायांचे विलीनीकरण आणि अधिग्रहण करून विविध मार्गांद्वारे जलद उद्योग वाढीच्या योजनांना चालना देत आहे.

विकास लाइफकेअर ही कंपनी मुख्यतः पॉलिमर आणि रबर कंपाऊंड्स आणि प्लास्टिक, सिंथेटिक आणि नैसर्गिक रबरसाठी विशेष अडिटीव्हसचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. विकास लाइफकेअर कंपनीने नुकताच आपल्या कच्च्या मालाच्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन व्यावसायात विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. यासह कंपनीने आता B2C विभागात देखील प्रवेश केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 05 January 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x