22 November 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

BCL Share Price | 75 रुप्याच्या शेअरने 1 महिन्यात 23 टक्के परतावा दिला, यापूर्वी दिला 600% परतावा, खरेदी करणार?

BCL Share Price

BCL Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 77.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 52 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 150 टक्के वाढवले आहेत. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 10.26 टक्के वाढीसह 75.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 मार्च 2021 रोजी 11.63 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आतापर्यंत या नीचांक किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी 600 टक्के नफा कमावला आहे. भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीत होणारी वाढ आणि वाढती मागणी यामुळे केंद्र सरकारने आणि तेल विपणन कंपन्यांनी कॉर्नपासून बनवलेल्या इथेनॉलच्या किमतीत 5.79 रुपये प्रति लिटरची वाढ करून त्याची किंमत 71.86 रुपये प्रति लिटर केली आहे.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या दिग्गज भारतीय तेल विपणन कंपन्यांनी कॉर्नपासून बनवलेल्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड यासारख्या डिस्टिलरीज ज्या पर्यायी स्त्रोतांपासून इथेनॉल बनवतात असा कंपन्यांना प्रचंड फायदा होणार आहे. याचा फायदा भारतातील कृषी क्षेत्राला देखील होऊ शकतो. आणि देशात मका लागवड मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेडने सेबीला कळवले की, कंपनी पुढील 2 वर्षांत आपले इथेनॉलचे उत्पादन दैनिक 850 किलोलिटरपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून इथेनॉलची मागणी वाढ आहे, त्यामुळे बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे अत्याधुनिक प्लांट इथेनॉल सुरू केला आहे.

भारतात इंधनाच्या किमती वाढत आहेत, हे लक्षात घेऊन बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने आधुनिक प्रणालीद्वारे बॉयलरला वीज देण्यासाठी स्टबलवर चालणारे वेगळे युनिट देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीएल इंडस्ट्रीज ही कंपनी भुसापासून बायोमास देखील निर्माण करणार आहे. यासाठी पंजाब सरकारने बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीला प्लांट उभारण्यासाठी सवलत देण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Share Price NSE Live 06 January 2024.

हॅशटॅग्स

BCL Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x