22 November 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Ather Electric Scooter | नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची नवी फौज येतेय, बहुचर्चित EV स्कुटर्स लाँच होतेय

Ather Electric Scooter

Ather Electric Scooter | जर तुम्ही नजीकच्या भविष्यात स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 2024 मध्ये अनेक दिग्गज कंपन्या आपल्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहेत. म्हणजेच आता स्कूटरमध्ये तेल घालण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

आगामी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या या शर्यतीत होंडा आणि यामाहासारख्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरने टॉप-10 सेल्समध्ये स्थान मिळवले होते. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी होणाऱ्या 3 मोस्ट अवेटेड इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल.

1. Ather Family Scooter
अलीकडच्या काळात स्कूटर सेगमेंटमधील ग्राहकांमध्ये एथर स्कूटरची मागणी खूप वाढली आहे. आता अथर आपल्या ग्राहकांसाठी २०२४ मध्ये नवीन फॅमिली स्कूटर लाँच करणार आहे. अथरची ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतकला टक्कर देईल. एका स्पाय शॉटनुसार, आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा हेडलाईट आडवा आणि अगदी पातळ दिसत आहे.

2. Honda Activa electric
होंडाची अॅक्टिव्हा ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. आता कंपनी होंडा अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतात लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एथर आणि टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे होंडा लवकरच अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे.

3. Yamaha Neo Scooter
जपानची दिग्गज वाहन निर्माता कंपनी यामाहा आता आपल्या निओ स्कूटर ब्रँडची नवीन इलेक्ट्रिक आवृत्ती भारतात लाँच करणार आहे. यामाहा आपली आगामी निओ इलेक्ट्रिक स्कूटर 50cc आणि 125cc मॉडेलमध्ये लाँच करू शकते. स्पोर्टी स्टाईल लुकमध्ये लाँच केले जाऊ शकते. आगामी स्कूटर मॅक्सी-स्कूटर स्टाइलमध्ये लाँच होऊ शकते. त्याचप्रमाणे आणखी अनेक कंपन्या या वर्षी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Ather Electric Scooter Price in India 07 January 2024.

हॅशटॅग्स

#Ather Electric Scooter(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x