23 November 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Reliance Power Share Price | किंमत 31 रुपये! 3 वर्षात 900% परतावा, रिलायन्स पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे. जानेवारी 2021 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3.3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीच्या पार गेले आहे.

मागील तीन वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 900 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.94 टक्के घसरणीसह 31.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जानेवारी 2024 च्या सुरुवातीच्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 36 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 28 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 9.05 या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवरून 264.5 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 2023 या वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे.

2023 या वर्षाच्या जानेवारी, फेब्रुवारी आणि ऑक्टोबर महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली होती. या तीन महिन्यांत रिलायन्स पॉवर स्टॉक अनुक्रमे 11.15 टक्के, 23.14 टक्के, 11.17 टक्के घसरला होता. तर नोव्हेंबर 2023 या एका महिन्यात रिलायन्स पॉवर स्टॉक सर्वाधिक म्हणजेच 23.68 टक्क्यांनी मजबूत झाला होता. तर एप्रिल 2023 या महिन्यात रिलायन्स पॉवर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 22.61 टक्के परतावा दिला होता. तर जुलै 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 17 टक्के नफा कमावून दिला होता.

शेअर बाजारातील तज्ज्ञाच्या मते, रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये पुढील काळात आणखी तेजी पाहायला मिळेल. मागील काही महिन्यापासून पॉवर स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर स्टॉक मजबूत तेजीचे संकेत देत आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक सल्लागारांनी रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदी करताना 21 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. रिलायन्स पॉवर ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी कोळसा, वायू, जल, पवन आणि सौर ऊर्जा यावर आधारित ऊर्जा निर्मिती करते. 1995 साली स्थापन झालेल्या रिलायन्स पॉवर कंपनीची कार्यरत वीज निर्मिती क्षमता 416 GW आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x