22 November 2024 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! अल्पावधीत पैसा वाढेल, रेकॉर्ड तारीखपूर्वी संधीचा फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | एमके एक्झिम या कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. एमके एक्झिम कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. MK Exim Share Price

कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी एमके एक्झिम कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 141.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एमके एक्झिम कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. एमके एक्झिम कंपनीने शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी रेकॉर्ड डेटमध्ये ज्या लोकांचे नाव असेल त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करेल.

ही कंपनी पहिल्यांदाच आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देणार आहे. यापूर्वी 2016 मध्ये एमके एक्झिम कंपनीने एका शेअरवर 0.50 रुपये लाभांश वाटप केला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमके एक्झिम कंपनीचे शेअर्स 124.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात एमके एक्झिम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 46 टक्क्यांनी वाढवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 134.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 72.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 335.32 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on MK Exim Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x