22 November 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Technologies Share Price | लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 180% परतावा देणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजी शेअर्सची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. आणि शेअरची लिस्टिंग किंमत इश्यू किंमतीपेक्षा 180 टक्क्यांनी अधिक होती. स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1400 रुपये किमतीवर पोहचले होते. ही कंपनीच्या शेअर्सची आजपर्यंतची सर्वोच्च किंमती होती. त्यानंतर या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली.

मागील 30 ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक फक्त 6 वेळा हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. तर 24 ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर घसरला होता. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.42 टक्के घसरणीसह 1,158.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

4 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर 1151 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक या नीचांक किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. डिसेंबर महिन्याच्या नीचांक किमतीवरून टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1286 रुपये किमतीची पोहचला होता आणि या काळात शेअर्सने गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला होता.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये नीचांक स्तरावरून प्रचंड व्हॉल्यूम पाहायला मिळत आहे. IPO लिस्टिंग प्रॉफिट वगळता या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फारशा परतावा कमावून दिलेला नाहीये.

बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1,156 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 1164 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टाटा टेक स्टॉकमध्ये बरीच नफा वसुली झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये या कंपनीचे शेअर्स मिळाले नव्हते, त्यांना आता गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आहे. तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक जर तेजीत आला तर शेअर्सची किंमत 1286 रुपये किमतीवर जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 11 January 2024.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x