25 April 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा Horoscope Today | 25 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रावरचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रावरचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

Medi Assist IPO | आला रे आला IPO आला! मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मोठा परतावा

Medi Assist IPO

Medi Assist IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही मेडी असिस्ट कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले पाहिजे. मेडी असिस्ट या हेल्थकेअर सुविधा पुरवणाऱ्या कंपनीचा IPO लवकरच बाजारात लाँच होणार आहे. मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारात लाँच केला जाईल.

मेडी असिस्ट हेल्थकेअर सर्व्हिसेस ही कंपनी मुख्यतः विमा कंपन्यांना ‘थर्ड पार्टी’ सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या IPO चा आकार 1,172 कोटी रुपये आहे. मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 397 रुपये ते 418 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या कंपनीचा IPO 15 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. अँकर गुंतवणूकदार 12 जानेवारी रोजी बोली लावू शकतात.

मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा IPO संपूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे. या IPO मध्ये प्रवर्तक आणि विद्यमान शेअरधारक 2,80,28,168 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. OFS अंतर्गत मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचे प्रवर्तक विक्रम जीत सिंग चटवाल, मेडिमीटर हेल्थ मॅनेजमेंट आणि बेसेमर हेल्थ कॅपिटल एलएलसी आपले शेअर्स विकणार आहे. मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहे, म्हणून या कंपनीला IPO मधून पैसे मिळणार नाहीत.

मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीच्या IPO मध्ये अप्पर प्राइस बँडवर स्टॉक वाटप केले गेले तर IPO च्या माध्यमातून 1,171.58 कोटी रुपये जमा होऊ शकतात. मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीने 50 टक्के कोटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 35 टक्के कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. उर्वरित 15 टक्के कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

कंपनीने एका लॉटमध्ये 35 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत. बेंगळुरस्थित मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनी आरोग्य-तंत्रज्ञान आणि ‘insurtech’ कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी नियोक्ते, किरकोळ सदस्य आणि सार्वजनिक आरोग्य योजनांना आरोग्य लाभ प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचे मुख्य ग्राहक विमा कंपन्या असतात.

मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनी 18 जानेवारी 2024 रोजी गुंतवणुकदारांना IPO स्टॉक वाटप करेल. आणि 22 जानेवारी रोजी शेअर बाजारात IPO स्टॉक लिस्टिंग केला जाईल. मेडी असिस्ट हेल्थकेअर ही कंपनी मुख्यतः विमा कंपन्यांना थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनी विमा कंपन्यांच्या वतीने आरोग्य विमा दावे हाताळते आणि नेटवर्क व्यवस्थापन करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Medi Assist IPO GMP 11 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Medi Assist IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या