एनसीपी'कडून तिवरे दुर्घटनाग्रस्तांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत; शरद पवारांची उपस्थिती
रत्नागिरी : चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.
तिवरे धरण दुुर्घटनाग्रस्तांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. सत्ताधाऱ्यांनी खेकड्यांना जवाबदार धरत कर्तव्य निभावले नाही आणि भरपाई हवी असेल तर वाहून गेलेल्या वस्तूंचे पुरावे द्या असे प्रशासकीय आदेश देखील सोडले. मात्र यावेळी राष्ट्रवादीने स्तुत्य असं पाऊल उचललं. तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना राष्ट्रवादीने मदतीचं वाटप केलं.
प्रत्येक पीडित कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत केली. शरद पवारांच्या उपस्थितीतच धनादेशांचं वाटप करण्यात आलं. तिवरे धरणतील पीडित कुटुंबांची शरद पवारांनी भेट घेतली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. स्थानिकांशी त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
दुर्घटनेत वाहून गेलेल्या जमिनींचीही पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. वाहून गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. मृतांच्या वारसदारांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे आम्ही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या अनुदानाचे धनादेश पदाधिकाऱ्यांमार्फत सुपूर्द केले. pic.twitter.com/rHRdc3HXXm
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 8, 2019
दादर-अकले या गावांना जोडणारा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आढळला, त्याची रुंदी व उंची वाढवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दादर आणि कळकवणे या गावांना जोडणारा पूलही धोकादायक असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. pic.twitter.com/PXRAPu4Jqm
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 8, 2019
या घटनेत पुलांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यात स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. काही पूल पुराच्या पाण्याच्या भरावाने कमकुवत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यांचीही पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. pic.twitter.com/fCOD7PjZVQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 8, 2019
इथल्या मुलांच्या शाळेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांच्या झालेल्या नुकसानामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन शासकीय ठिकाणी या पुनर्वसनाची मागणी समोर आली आहे. गुरा-ढोरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र उर्वरित पंचनामे बाकी आहेत ते लवकरात लवकर करण्याची गरज आहे. pic.twitter.com/13BmUaeXeN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 8, 2019
शासनाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचे समजले. साधारण ४५ कुटुंबं बाधित झाली आहेत, २३ जण मृत्युमुखी पडले आहेत. तिघांचे मृतदेह अजूनही हाती लागलेले नाहीत. शासनाने तातडीने याची दखल घेण्याची गरज आहे. pic.twitter.com/3mKorRp0fo
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 8, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार