25 April 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी स्टॉक 3.10 टक्क्यांनी घसरला, मात्र तज्ज्ञांना विश्वास - NSE: APOLLO IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
x

Nazara Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट नजारा टेक्नॉलॉजी शेअर मजबूत तेजीत, खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड का उडाली?

Nazara Share Price

Nazara Share Price | नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील गुंतवणूक केली आहे. शुक्रवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 974.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

6 सप्टेंबर 2023 रोजी नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 927.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मार्च 2023 मध्ये नजारा टेक्नॉलॉजी या कंपनीचे शेअर्स 481.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी नजारा टेक्नॉलॉजी स्टॉक 4.59 टक्के वाढीसह 944 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नजारा टेक्नॉलॉजी ही कंपनी मुख्यतः गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून व्यवसाय करते. या कंपनीचे मुख्यालय भारतात आहे, मात्र कंपनीचा मुख्य व्यवसाय आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या सारख्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात चालतो.

नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये गेमिंग, ईस्पोर्ट्स आणि एडटेक इकोसिस्टम यसारखे अनेक उद्योग सामील आहेत. या कंपनीच्या लोकप्रिय गेमिंग विभागांमध्ये किडोपिया आणि अ‍ॅनिमल जॅम, क्विक लर्निग, वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.

आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल ते सप्टेंबर तिमाहीत नाझारा टेक्नॉलॉजी कंपनीने 13 टक्के वाढीसह 551.7 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. त्याच वेळी, या कंपनीचा PAT वार्षिक आधारावर 42 टक्क्यांच्या वाढीसह 45 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे EBITDA मार्जिन 11.1 टक्क्यांवर पोहचले आहे. नजारा टेक्नॉलॉजी कंपनीने Zerodha कंपनीचेसह-संस्थापक निखिल कामथ आणि SBI म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 510 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील नजारा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सध्या नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे 6588620 शेअर्स आहे. म्हणजेच त्यांच्या कडे कंपनीचे एकूण 9 टक्के भाग भांडवल आहे.

भारता सारख्या देशात जिथे तरुण लोक संख्या सर्वाधिक आहे, या देशात गेमर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गेमिंग उद्योगामध्ये आणखी वाढ होत आहे. त्यामुळे नजारा टेक्नॉलॉजी कंपनी भारतीय मोबाइल गेम्स उद्योगात अफाट वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nazara Share Price NSE Live 13 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nazara Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या