25 November 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

Zomato Share Price | मागील 1 वर्षात 155 टक्के परतावा देणाऱ्या झोमॅटो शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Zomato Share Price

Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. सध्या झोमॅटो कंपनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मनी देखील या कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 0.61 टक्के वाढीसह 139.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

काही दिग्गज ब्रोकरेज फर्मने झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइसे वाढवली आहे. Jefferies ने झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 165 रुपयेवरून वाढवून 190 रुपये केली आहे. तर गोल्डमन सॅक्स फर्मने देखील झोमॅटो स्टॉकची टार्गेट प्राइस 130 रुपयेवरून वाढवून 160 रुपये जाहीर केली आहे.

मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी झोमॅटो स्टॉकची टार्गेट प्राइस 140 रुपयेवरून वाढवून 150 रुपये केली आहे. एचएसबीसी फर्मच्या तज्ञांनी झोमॅटो स्टॉकची टार्गेट प्राइस 140 रुपये वाढवून 150 रुपये केली आहे. या चारही ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेल्या टार्गेट प्राइसची सरासरी 143.8 रुपये होती, जी आता वाढून 162.5 रुपये झाली आहे. 12 जानेवारी 2024 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 141.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील एका महिन्यात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत झोमॅटो स्टॉकची किंमत 25 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत झोमॅटो स्टॉक तब्बल 78 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील एका वर्षात गुंतवणूकदारांनी झोमॅटोमधून 155 टक्के परतावा कमावला आहे.

16 नोव्हेंबर 2021 रोजी झोमॅटो स्टॉक 169 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. तर 27 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 41 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीचा IPO जुलै 2021 मध्ये 76 रुपये किमतीवर बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी शेअरची लिस्टिंग किंमत 115 रुपये होती.

अनेक ब्रोकरेजच्या मते, झोमॅटो कंपनीचा वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे. आर्थिक वर्ष 2024-30 दरम्यान झोमॅटो कंपनीच्या महसुलाची सरासरी वाढ 30 टक्के राहू शकते. तर ऑनलाइन किराणा मालाची वाढ 29 टक्के आणि अन्न वितरण व्यवसायाची वाढ 20 टक्के राहण्याचा अंदाज आहे. यासह कंपनीने आपली प्लॅटफॉर्म फी देखील वाढवली आहे, याचा फायदा कंपनीला मिळेल. DII, FII ने झोमॅटो कंपनीच्या शेअरवर अधिक विश्वास टाकला आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीत DII ने झोमॅटो कंपनीचे 13.04 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर जून 2023 तिमाहीत DII चा वाटा 9.93 टक्के होता. आणि मार्च 2023 तिमाहीत DII चा वाटा 8.04 टक्के होता. FII ची हिस्सेदारी सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत 54.72 टक्केवर गेली आहे, जी जून 2023 तिमाहीत 54.43 टक्केवर होती.

झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये भारतातील विविध 28 म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केली आहे. DII श्रेणीतील म्युच्युअल फंडांनी झोमॅटो कंपनीमधील आपला हिस्सा QoQ आधारावर 8.30 टक्क्यांवरून वाढवून 10.56 टक्क्यांवर नेला आहे. मोतीलाल ओसवाल MF ने झोमॅटो कंपनीचे 1.88 टक्के, Mirae Asset म्युचुअल फंडने झोमॅटो कंपनीचे 1.46 टक्के, Axis Mutual Fund ने झोमॅटो कंपनीचे 1.33 टक्के, Nippon म्युचुअल फंडने झोमॅटो कंपनीचे 1.27 टक्के आणि ICICI प्रुडेन्शियल फंडने झोमॅटो कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE Live 13 January 2024.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x