25 November 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620
x

IPO GMP | पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO GMP ने दिले फायद्याचे संकेत

IPO GMP

IPO GMP | मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. नुकताच या कंपनीने आपल्या अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 351.50 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 418 रुपये किमतीवर 84,08,449 शेअर्स वाटप केले आहे. या कंपनीच्या IPO मध्ये तब्बल 18 कंपन्यांनी अँकर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आहेत. यापैकी 11 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.

मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीच्या अँकर गुंतवणूकदारांमध्ये नोमुरा ट्रस्ट, गोल्डमन, अशोक व्हाइटोक, पाइनब्रिज ग्लोबल फंड्स, टू कॅपिटल आणि एचएसबीसी यांसारख्या दिग्गज संस्था सामील आहेत. तर म्युच्युअल फंड संस्थामध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा ट्रस्टी, आदित्य बिर्ला सन लाइफ ट्रस्टी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स यासारख्या दिग्गज संस्थांनी मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा IPO 15 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 397 रुपये ते 418 रुपये जाहीर केली होती. किरकोळ गुंतवणूकदार एका वेळी एका लॉट अंतर्गत फक्त 35 शेअर्स खरेदी करू शकतात. किरकोळ गुंतवणूकदाराना या कंपनीचा एक लॉट खरेदी करण्यासाठी 14,630 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीच्या IPO मध्ये कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात.

मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीच्या IPO मध्ये 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर 35 टक्के वाटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा IPO स्टॉक 54 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

जर लिस्टिंगपर्यंत मेडी असिस्ट हेल्थकेअर GMP याच किमतीवर टिकुन राहिले तर गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 12.92 टक्के नफा मिळू शकतो. तज्ञांच्या मते, मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO स्टॉक 500 रुपये किमतीच्या जवळपास सूचीबद्ध होऊ शकतात. मेडी असिस्ट हेल्थकेअर सर्व्हिसेस IPO स्टॉक 22 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP Medi Assist IPO 15 January 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x