25 November 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Reliance Home Finance Share Price | 107 रुपयांचा शेअर 5 रुपयांवर आला, आता 1 महिन्यात दिला 118% परतावा

Reliance Home Finance Share Price

Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अंबानी यांची रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत.

अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहातील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स पेनी स्टॉक म्हणून ट्रेड करत आहेत. यासह अनिल अंबानी यांच्या सर्व कंपन्यांचे मालकी हक्क इतर गुंतवणूकदारांनी ताब्यात घेतले आहे. सध्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 6 रुपयेच्या खाली ट्रेड करत आहेत. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एकेकाळी रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे मालक आणि MD म्हणून काम करणारे अनिल अंबानी यांच्याकडे आता रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे फक्त 2,73,891 शेअर्स आहेत. त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे फक्त 2,63,474 शेअर्स आहेत. अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे 28,487 शेअर्स आहेत.

सप्टेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकाकडे कंपनीचे एकूण 0.74 टक्के भाग भांडवल आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे 99.26 टक्के भाग भांडवल आहेत.

रिलायन्स होम फायनान्स कंपनीची सप्टेंबर 2023 तिमाहीत निव्वळ विक्री 99 टक्क्यांनी घसरून 0.16 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीची निव्वळ विक्री 140.77 कोटी रुपये होती. सप्टेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीला 2.56 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. या तिमाहीत कंपनीचा EBITDA देखील 2.56 कोटी रुपये नकारात्मक राहिला आहे.

रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील तीन महिन्यांत 163 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील एका महिन्यात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स118 टक्के वाढले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.87 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.22 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 95 टक्के घसरले आहे. सप्टेंबर 2017 मध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 107 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Home Finance Share Price NSE Live 16 January 2024.

हॅशटॅग्स

Reliance Home Finance Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x