25 November 2024 9:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

IRFC Share Price | अल्पावधीत 350 टक्के परतावा देणाऱ्या IRFC शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिला फायद्याचा सल्ला

IRFC Share Price

IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात IRFC स्टॉक मजबूत वाढला आहे. सध्या IRFC कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. IRFC कंपनीचा IPO सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.5 पट अधिक परतावा कमावून दिला आहे.

मागील 10 महिन्यांत IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC स्टॉक 13 टक्के वाढीसह 128 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी IRFC स्टॉक 10.34 टक्के वाढीसह 143.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांसारख्या वित्तीय श्रेणीतील इतर कंपन्यांच्या शेअर्सच्या तुलनेत IRFC कंपनीचा स्टॉक स्टार परफॉर्मर ठरला आहे. मागील एका वर्षभरात IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 242.54 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात फक्त 27.35 टक्के वाढले आहेत. बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात लोकांना 19.31 टक्के नफा कमावून दिला आहे. तर जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढले आहेत. PFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 233.83 टक्के परतावा कमावून दिला आहे.

28 मार्च 2023 रोजी IRFC स्टॉक 25.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमतीवर ट्रेड करत होता. या किंमत पातळीवरून स्टॉक आता जवळपास 348 टक्के मजबूत झाला आहे. जर तुम्ही वार्षिक नीचांकी किमतीवर IRFC स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3,48,000 रुपये झाले असते.

मागील 6 महिन्यांत IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स जवळपास 10 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. सध्या या IRFC कंपनी शेअर्स नवीन ब्रेक आऊट देत आहे. जर तुम्ही चांगली कमाई करण्यासाठी गुंतवणूक करू इच्छीत असाल तर IRFC स्टॉक खरेदी करू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 16 January 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x