22 November 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! 12 दिवसात दिला 50 टक्के परतावा, आता कंपनीने दिली मोठी अपडेट

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. 2024 या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विकास लाइफकेअर स्टॉकने 4.95 रुपये किमतीवरून वाढून आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 2.94% घसरून 6.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला कळवले की, त्यांनी आपली उपकंपनी असलेल्या जेनेसिस गॅस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून संयुक्त उपक्रम स्थापना केली आहे. विकास लाइफकेअर कंपनीने 108 कोटी रुपये गुंतवणुक करून स्मार्ट मीटर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी एक संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.

विकास लाइफकेअर कंपनीची उपकंपनी असलेल्या जेनेसिस गॅस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीसोबत हा संयुक्त उपक्रम IGL जेनेसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या नावाने स्थापन केला आहे. यामध्ये दोन्ही कंपन्यांचा वाटा 49 : 51 असेल.

108 कोटी रुपये गुंतवणूक करून सुरु केल्या जाणाऱ्या या संयुक्त उपक्रमाची स्थापना उत्तर प्रदेश राज्यातील नोएडा येथे करण्यात येणार आहे. या संयुक्त उपक्रम अंतर्गत एक स्मार्ट मीटर निर्मिती प्रकल्प उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे. विकास लाइफकेअर कंपनीने माहिती दिली की, या स्मार्ट मीटर प्लांटची उत्पादन क्षमता वार्षिक 10 लाख स्मार्ट मीटर बनवण्याची असेल. हा युनिट 65,000 स्क्वेअर फूट जागेवर स्थापना केला जाणार आहे. या युनिटमध्ये जुलै 2024 पर्यंत काम सुरू होण्याची शक्यता आहे.

मागील एका महिन्यात विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सची किंमत 120 टक्क्यांनी वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स फक्त तीन रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 16 January 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x