22 April 2025 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Reliance Share Price | भरवशाचे रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स खरेदी करा, तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली

Reliance Share Price

Reliance Share Price | आज शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र अनेक गुंतवणूकदारांसाठी शेअर बजारातील विक्रीचा दबाव गुंतवणूकीची सुवर्ण संधी असते. आज अशीच काहीशी संधी तुम्हाला मिळाली आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाचे एकूण बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहेत. यात रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी सर्वात पुढे आहे.

अमेरिकन स्टॉक मार्केट आणि जागतिक गुंतवणूक बाजारातून नकारात्मक संकेत मिळून देखील भारतीय शेअर बाजार तेजीत वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती शेअर बाजाराला अधिक ताकद प्रदान करत आहे. त्यामुळे तज्ञांनी शेअर बाजारात बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.22 टक्के घसरणीसह 2,743.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञ म्हणतात की, प्रत्येक घसरणीत तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला तेजीच्या काळात चांगला फायदा मिळू शकतो. आतापर्यंत आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत सहभाग घेत नव्हते. मात्र आता हे शेअर्स देखील सुसाट रॅलीसाठी तयार झाले आहेत. त्यामुळे IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 3000 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी पुढील काळात 20 लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा स्पर्श करेल यात प्रश्नच नाही. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपली सर्वकालीन उच्चांक किंमत देखील स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, रिलायन्स एनर्जी, रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स न्यू एनर्जी यासारखे विभाग रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला अधिक ताकद प्रदान करत आहेत. अनेक कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक पाहायला मिळाले आहेत. हे घटक शेअर बाजारात आणखी तेजी आणू शकतात. त्यामुळे योग्य वेळी स्टॉकमध्ये एंट्री घेणे खूप गरजेचे आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 17 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या