Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीला सर्वोत्तम रेटिंग मिळण्याची शक्यता, शेअर्सला फायदा होणार?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत 294 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मात्र तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. नफ्यातील ही घसरण सहयोगी आणि संयुक्त उपक्रम म्हणून काम करणाऱ्या कंपन्याकडून लाभांशाचे उत्पन्न न मिळाल्यामुळे आणि कंपनीच्या परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे पाहायला मिळाली आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीपासून विलग होऊन शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. मात्र अद्याप या कंपनीने आपला व्यवसाय पूर्ण ताकदीने सुरू केलेला नाहीये. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 2.45 टक्के घसरणीसह 242.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
तिमाही आधारावर कमाईच्या बाबतीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने फारशी मजबूत कामगिरी केली नाहीये. मात्र तरीही वित्त पुरवठा उद्योगात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे महत्त्व कमी लेखले जाऊ शकत नाही. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी वित्तीय क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.
मुकेश अंबानी यांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकले आहेत, त्या क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. जसे की, जिओ टेलिकॉम ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची दूरसंचार युनिट मागील 7 वर्षांत भारतातील सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर बनली आहे.
रिटेल उद्योगात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची उपकंपनी रिलायन्स रिटेल कंपनी नफ्याच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा युनिटच्या कामगिरीवर लागल्या आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे व्यापारी धोरण देशातील सर्व आर्थिक सेवांचे लोकशाहीकरण करणे हे आहे. यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आपल्या सेवा डिजिटल पद्धतीने प्रदान करण्याची योजना आखत आहे. व्यापारी आणि अंतिम ग्राहक अशा दोन प्रकारच्या ग्राहकांना सेवा देण्याचे उद्दिष्ट जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने निर्धारित केले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायात आपला मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे. जिओ फायनान्शिअल कंपनीने आपल्या या रिटेल वर्गातील ग्राहकाला कॅश इन करण्याची अपेक्षा आहे. जिओ फायनान्शियल ही कंपनी सर्व प्रकारची सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज पुरवठा सेवा प्रदान करण्याची तयारी करत आहे. तथापि कंपनीचे मुख्य लक्ष सुरक्षित कर्ज देण्यावर असेल. ग्राहक उपकरणे, एअरफायबर, फोन, लॅपटॉप, फायनान्स आणि लीज ऑपरेशन सेवा प्रदान करण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी एक स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याची योजना आखत आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर्स आणि म्युच्युअल फंडांवर कर्ज देण्याचा ही विचार करत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीकडे कर्ज व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत. सप्टेंबर 2023 अखेर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीची एकूण संपत्ती 1,15,500 कोटी होती. याचा फायदा कंपनी कर्ज व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी करेल. शिवाय या कंपनीला लवकरच AAA रेटिंग देखील मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी स्पर्धात्मक दरांवर अधिक भांडवल उभारणी करण्यासाठी सक्षम बनेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jio Financial Share Price NSE Live 17 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल