22 November 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

Jai Balaji Share Price | फक्त 53 रुपयाच्या शेअरने 3 वर्षात दिला 3824 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार का?

Jai Balaji Share Price

Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड या मेटल आणि खाण कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स फक्त 53.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1046.90 रुपये किमतीवर पोहचले होते.

आज या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी नफा वसुली पहायला मिळत आहे. मात्र ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी या स्टॉकवर पैसे लावून संयम राखला, ते लोक आता श्रीमंत झाले आहे. मागील एका वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1845 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 1,004.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जानेवारी 2023 मध्ये ज्या लोकांनी जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.94 लाख रुपये झाले आहे. 2024 हे वर्ष सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत, मते या काळात जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 34 टक्के वाढली आहे.

जुलै 2023 पासून सलग सात महिने या कंपनीचे शेअर्स सकारात्मक तेजीसह वाढत आहेत. जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळात जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 1277 टक्क्यांनी वाढली आहे. जुलै 2023 या एका महिन्यात जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 106.5 टक्के वाढले होते.

ऑगस्ट 2023 या एका महिन्यात जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला होता. तर सप्टेंबर 2023 मध्ये हा स्टॉक 61.4 टक्के वाढला होता. जून 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. 17 जानेवारी 2024 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1,046.90 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 42 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 2392 टक्क्यांनी वाढले आहे.

मागील तीन वर्षांत जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3824 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3422 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः लोह आणि पोलाद वस्तू बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी स्पंज आयरन, पिंग आयरन, डीआरआय, डक्टाइल आयर्न पाईप, फेरो क्रोम, टीएमटी बार, कोक स्टील बार, रॉड, सिंटर, ऑनमिंटल स्टील ग्रिल, पोर्टलँड स्लॅग सिमेंट, फेरो अलॉयज आणि मिश्र धातु कार्बन आणि माईल्ड स्टील बिलेट्स आणि राउंड्स बनवण्याचा व्यवसाय करते.

जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी बालाजी शक्ती ब्रँड अंतर्गत TMT बार देखील बनवते. ही कंपनी आपली उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात देखील करते. जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची स्थापना 1999 साली कोलकाता येथे झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Balaji Share Price BSE Live 18 January 2024.

हॅशटॅग्स

Jai Balaji Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x