IPO GMP | मार्ग श्रीमंतीचा! 33 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी 166 टक्के परतावा देईल, मजबूत कमाई होणार
IPO GMP | मॅक्सपोजर या गडिजिटल मीडिया आणि मनोरंजन कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. 17 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचा IPO इश्यू 904.86 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. मॅक्सपोजर कंपनीच्या IPO मधील 44.4 लाख शेअर्सच्या ऑफरवर गुंतवणूकदारांनी 401.75 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आहे. प्रचंड सबस्क्रिप्शनच्या बाबतीत मॅक्सपोजर कंपनीचा आयपीओने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी KC Energy & Infra या SME कंपनीचा IPO 1,000 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. MaxPosure IPO
मॅक्सपोजर या कंपनीच्या IPO चा आकार 20.26 कोटी रुपये आहे. मॅक्सपोजर कंपनीच्या IPO मध्ये गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या राखीव कोट्यातील शेअर्ससाठी 1,981.4 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या कोट्यातील शेअर्सवर 1,049.2 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा एकूण 156.3 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
मॅक्सपोजर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 31-33 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO 15 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 4000 शेअर्स ठेवले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना किमान 1,24,000 रुपये जमा करावे लागले होते. तर गुंतवणूकीची कमाल रक्कम मर्यादा 132,000 रुपये होती.
मॅक्सपोजर या कंपनीच्या प्रवर्तक गटात प्रकाश जोहरी आणि स्वेता जोहरी आहेत. मॅक्सपोजर कंपनीने GYR Capital Advisors Pvt Ltd फर्मला IPO चे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर BigShares Services Pvt Ltd फर्मला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या कंपनीच्या IPO साठी मार्केट मेकर म्हणून गिरीराज स्टॉक ब्रोकिंग फर्मला नियुक्त करण्यात आले होते. इंडिया अहेड व्हेंचर फंड वॉलफोर्ट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि फिनाव्हेन्यू कॅपिटल ट्रस्ट-फिनाव्हेन्यू ग्रोथ फंड या दोन्ही संस्थांनी मॅक्सपोजर कंपनीचा IPO लाँच होण्या पूर्वीच कंपनीचे भाग भांडवल खरेदी केले आहे.
ग्रे मार्केटचा आढवा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, मॅक्सपोजर कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 55 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 88 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ज्या गुंतवणुकदारांना हा IPO स्टॉक वाटप केला जाईल, त्यांना पहिल्याच दिवशी 166 टक्के नफा मिळू शकतो. 18 जानेवारी 2024 रोजी कंपनी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप करेल. 19 जानेवारी 2024 पासून शेअर न मिळालेल्या लोकांना पैसे परत केले जातील. आणि 22 जानेवारी रोजी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर मॅक्सपोजर कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध केले जातील.
मॅक्सपोजर या कंपनीची स्थापना 2006 साली करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः कंटेंट, जाहिरात आणि टेक्नो क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या ग्राहक वर्षात सेवा इंडिगो, एअर इंडिया, गल्फ एअर, मध्य प्रदेश पर्यटन मंडळ, भारतीय परराष्ट्र मंत्रालय, ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स यासारख्या संस्था सामील आहेत. ही कंपनी एअरलाइन कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या प्रवाशांसाठी इन-फ्लाइट मनोरंजन प्रदान करण्याचे काम देखील करते. मॅक्सपोजर कंपनी तामिळ, मराठी, गुजराती, जर्मन, रशियन, अरबी, पोर्तुगीज, जपानी, चीनी आणि फ्रेंच यासह विविध 21 परकीय आणि भारतीय भाषांमध्ये कंटेंट बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPO GMP MaxPosure IPO 18 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार