22 November 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

IPO GMP | कुबेर पावणार! पहिल्याच दिवशी 240 टक्के परतावा देणार 33 रुपयांचा IPO शेअर, तुमची खरेदी केला?

IPO GMP

IPO GMP | मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीच्या IPO वर गुंतवणुकदारांनी तब्बल 987 पट अधिक बोली लावली आहे.

तज्ञांच्या मते, लिस्टींगच्या दिवशी मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. तज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 240 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी या कंपनीचा शेअर्स 110 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो. मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 31 रुपये ते 33 रुपये निश्चित केली आहे. त्याच वेळी या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 80 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर या कंपनीचे शेअर्स 33 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले तर हा स्टॉक 113 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

ज्या गुंतवणूकदारांना मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सचे वाटप केले जातील, त्यांना लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 243 टक्के नफा मिळू शकतो. मॅक्सपोजर लिमिटेड या कंपनीचा IPO 15 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 20.26 कोटी रुपये आहे.

मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीचा IPO एकूण 987.47 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1034.23 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1947.55 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 162.35 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये फक्त 1 लॉट खरेदी करू शकत होते. एका लॉटमध्ये कंपनीने 4000 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 132000 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Maxposure IPO Listing 20 January 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x