Bonus Shares | फ्री शेअर्स मिळतील या कंपनीचे! अल्पावधीत पैसे वाढतील, अवघ्या 5 दिवसात 30% परतावा दिला
Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनीअरिंग या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आता कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. त्यामुळे सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. Salasar Techno Share Price
सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी गुंतवणुकदारांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 च्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 19.42 टक्के वाढीसह 94.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने यापूर्वी जुलै 2021 मध्ये शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.
जून 2022 मध्ये सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट केले होते. या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये विभाजित केले होते. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनी मुख्यतः टेलिकम्युनिकेशन, पॉवर, रिन्यूएबल, स्मार्ट सिटी सोल्यूशन्स, पोल आणि हेवी स्टील स्ट्रक्चर्स सेगमेंटमध्ये व्यवसाय करते.
सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2417 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 एप्रिल 2020 रोजी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 3.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 जानेवारी 2024 रोजी सालासर टेक्नो कंपनीचे शेअर्स 94.88 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 3 वर्षांत सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 581 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 जानेवारी 2021 रोजी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 13.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 93 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 79 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bonus Shares on Salasar Techno Share Price 22 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC