22 November 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

SJVN Share Price | अल्पावधीत 225 टक्के परतावा देणाऱ्या SJVN कंपनीने दिली महत्वाची अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्के वाढीसह 110.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी एसजेव्हीएन कंपनीने एक मोठी डील झाल्याची घोषणा केली. आणि मंगळवारी शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती.

आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. नुकताच महामार्ग प्रकल्पांच्या संदर्भात तांत्रिक सल्ला सेवा प्रदान करण्यासाठी एसजेव्हीएन कंपनी आणि NHAI यांनी करार केला आहे. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 3.18 टक्के वाढीसह 107.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत NHAI चे अध्यक्ष संतोष कुमार यादव आणि एसजेव्हीएन संचालक सुशील शर्मा यांनी नवीन करारावर स्वाक्षरी करून करार संपन्न झाल्याची बातमी जाहीर केली होती. एसजेव्हीएन कंपनीने म्हंटले की, कंपनीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसोबत जो सामंजस्य करार केला आहे, त्याचा प्राथमिक उद्देश तांत्रिक सल्लागार सेवा प्रदान करणे हा आहे. एसजेव्हीएन कंपनी हिमाचल प्रदेशातील विविध डोंगराळ भागात NHAI च्या विविध प्रकल्पांसाठी संरक्षण कामांचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी पार पडणार आहे..

एसजेव्हीएन कंपनी NHAI च्या विविध प्रकल्पांच्या डिझाइनची तांत्रिक छाननी करून बांधकामांचे निरीक्षण करेल. यासह कंपनी गुणवत्ता नियंत्रण चाचण्या देखील पार पडणार आहे. एसजेव्हीएन कंपनीकडून ही सल्लागार सेवा दोन वर्षांसाठी घेतली जाणार आहे. एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स सध्या 110 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सधारकांनी 225 टक्के नफा कमावला आहे. मागील एका वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सची किंमत 34 रुपयेवरून वाशून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 335 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 24 January 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x