22 November 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Borosil Renewables Share Price | 17 पैशांच्या शेअरने आयुष्य बदललं! 6300% परतावा दिला, आता या कारणाने पुन्हा तेजीत

Borosil Renewables Share Price

Borosil Renewables Share Price | बोरोसिल रिन्यूएबल्स या सोलर ग्लास मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 632 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना बोरोसिल रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट कमाई करून दिली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी बोरोसिल रिन्यूएबल्स स्टॉक 2.10 टक्के वाढीसह 621.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एकेकाळी 17 पैशांवर ट्रेड करणारे बोरोसिल रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्स 600 रुपये किमतीच्या पार गेले आहे. नुकताच नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली की, भारत सरकार १ कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर पॅनेल बसवून ऊर्जा निर्मिती करणार आहे. हे प्रकल्प प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत सुरू केले जाईल.

सरकारने ही योजना जाहीर करताच मंगळवारी सोलर कंपन्यांच्या शेअर्समध्ये अफाट तेजी निर्माण झाली होती. बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीच्या शेअर्स व्यतिरिक्त तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये वेबसोल एनर्जी सिस्टीम, स्टर्लिंग आणि विल्सन रिन्युएबल एनर्जी, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज आणि टाटा पॉवर या कंपन्यांचे शेअर्स सामील होते.

22 जानेवारी 2004 रोजी बोरोसिल रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर 17 पैशांवर ट्रेड करत होते. 24 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 632 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या काळात बोरोसिल रिन्युएबल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 360,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 10 वर्षांत बोरोसिल रिन्यूएबल्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 6300 टक्के अधिक नफा कमावून दिला आहे. बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 31 जानेवारी 2014 रोजी 9.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र नुकताच हा स्टॉक 632 रुपये किमतीवर जाऊन खाली आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Borosil Renewables Share Price NSE Live 25 January 2024.

हॅशटॅग्स

#Borosil Renewables Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x