18 November 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
x

REC Share Price | मल्टिबॅगर आरईसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, सरकारच्या 'या' घोषणेचा कंपनीला मोठा फायदा होणार

REC Share Price

REC Share Price | आरईसी लिमिटेड या सरकारी कंपनीने नुकताच डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आता भारत सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर केली आहे. या सरकारी योजनेचा फायदा आरईसी लिमिटेड सारख्या कंपन्यांना होणार आहे.

त्यामुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होत. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 463.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 472.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 484 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मात्र आज नफावसुलीमुळे शेअरमध्ये थोडीशी पडझड पाहायला मिळत आहे.

डिसेंबर 2023 च्या तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीने 13.5 टक्क्यांच्या वाढीसह 3,308.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये आरईसी लिमिटेड कंपनीने 2,915.33 कोटी रुपये नफा कमावला होता. आरईसी लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 9795.47 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या तिमाहीत कंपनीने 12071.54 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या या 9 महिन्यांमध्ये आरईसी लिमिटेड कंपनीने 10,003 कोटी रुपये नफा कमावला आहे. आरईसी लिमिटेड कंपनीचे कर्ज बुक देखील वाढले आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत या कंपनीवर 4.11 लाख कोटी रुपये कर्ज होते. जे आता 21 टक्क्यांनी वाढून 4.97 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. कंपनीच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे.

31 डिसेंबर 2023 पर्यंत आरईसी लिमिटेड कंपनीचे भांडवल पर्याप्तता प्रमाण सरसरी 28.21 टक्के होते. आरईसी कंपनीच्या संचालक मंडळाने त्याची उपकंपनी असलेल्या आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीला एसपीव्ही स्थापन करण्याची परवानगी दिली आहे.

आरईसी लिमिटेड ही कंपनी मोदी सरकारच्या नवीन प्रधानमंत्री सूर्योदय योजनेला आधिक हातभार लावू शकते. हा योजने अंतर्गत भारत सरकार रूफटॉप सोलर पॅनेल स्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वितरीत करणार आहे. आरईसी लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकृत एजन्सी म्हणून निवडण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | REC Share Price NSE Live 25 January 2024.

हॅशटॅग्स

REC share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x