23 November 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537
x

मंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Swabhimani Shetkari Sanghatana, Sadabhau Khot, Raju Shetty, Farmers, Milk Producers Issue, Onion Producers Issue

पुणे : मंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं विळा-भोपळ्याचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्री सदाभाऊ खोत यांना शहं देण्याचे प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केले जातात. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

पुणे विद्यापीठ रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत बुधवारी ( १० जुलै ) प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थितांना संबोधत होते. त्यावेळी पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा परतावा मिळत नाही. विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच सरकार धोरण राबवित आहे. यात भ्रष्टाचार झाला अशा घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत दिल्या.

जोरदार घोषणाबाजीमुळे संबंधित ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान बैठकीत काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण होताच पोलीसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना सभागृहाबाहेर काढले आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रम पूढे पार पडला.

हॅशटॅग्स

#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x