18 November 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

IREDA Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत कमाई करून देतोय, 4 दिवसात 31 टक्के परतावा दिला

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स चालू आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी 5 टक्क्यांच्या वाढीसह 161.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 169.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर 154.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 4 दिवसात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्के वाढली आहे. आयआरईडीए या सरकारी कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 32 रुपये निश्चित केली होती. या इश्यू किमतीच्या तुलनेत आयआरईडीए स्टॉक 87.5 टक्के प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता.

आयआरईडीए कंपनीचा स्टॉक आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 405 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन नीचांक किंमत पातळी 49 रुपये होती. डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत आयआरईडीए कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे एकूण 25 टक्के भाग भांडवल होते.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत आयआरईडीए कंपनीने निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने तब्बल 355.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 200.75 कोटी रुपये नफा कमावला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1,253.19 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 868.97 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा एकूण खर्च वाढून 867.05 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 634.27 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आयआरईडीए ही सरकारी कंपनी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1987 साली करण्यात आली होती. आयआरईडीए कंपनी भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कामकाज करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 25 January 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x