26 November 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 14 रुपये! व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर्सवर काय परिणाम होणार?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने स्टॉक एक्सचेंजेसला कळवले आहे की, मंगळवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर कंपनी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी आपले आर्थिक निकाल जाहीर करण्यापूर्वी, इंडस टॉवर्सने निवेदन जाहिर करून माहिती दिली आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले भांडवल उभारणीचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही.

इंडस टॉवर कंपनीच्या मोठ्या ग्राहकांमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनी देखील सामील आहे. इंडस टॉवर कंपनी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल आधीच जाहीर केले आहेत. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 14.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

डिसेंबर 2023 तिमाही निकालांसोबत इंडस टॉवर कंपनीने जाहीर केले की, व्होडाफोन आयडिया कंपनीची भांडवल उभारणीची योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. व्होडाफोन आयडिया कंपनीने अद्याप 31 डिसेंबर 2022 पर्यंतची थकबाकी परतफेड केली नाहीये. इंडस टॉवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडिया कंपनीकडून 5699 कोटी रुपये देणी वसूल करणे बाकी आहे.

यामध्ये आर्थिक वर्ष 2023 मधील 5308 कोटी रुपयेची थकबाकी देखील सामील आहे. जून तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने म्हंटले होते की, व्होडाफोन आयडिया कंपनीचे पुढील कार्य कंपनी भविष्यात किती अतिरिक्त निधी उभारू शकते यावर अवलंबून असेल.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने ऑक्टोबर 2023 मध्ये माहिती दिली होती की, कंपनीच्या प्रवर्तकाकडून 2000 कोटी रुपयेचा निधी डिसेंबर 2023 तिमाहीपूर्वी परतफेड केला जाईल. जून तिमाहीत या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा प्रवर्तक गट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 2000 कोटी रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंडस टॉवर कंपनीने अद्याप माहिती दिली नाहीये की, जानेवारी 2024 पासून व्होडाफोन आयडिया कंपनी मासिक बिल पेमेंट करत आहे की नाही. BoFA सिक्युरिटीज फर्मने 10 जानेवारी 2024 रोजी आपल्या एका अहवालात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मासिक बिलाचा उल्लेख केला होता. या अहवालात ब्रोकरेज फर्मने इंडस टॉवर कंपनीचे रेटिंग अपग्रेड केले होते. मागील 6 ते 9 महिन्यांपासून व्होडाफोन आयडिया कंपनी आपले मासिक पेमेंट वेळेवर करत असल्याची माहिती इंडस टॉवर कंपनीने दिली आहे.

मागील वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीने केंद्रीय दूरसंचार विभागाला व्याजासह 1701 कोटी रुपयेची थकबाकी परतफेड केली होती. ही पेमेंट 2022 दरम्यानच्या स्पेक्ट्रम लिलावाचा हप्ता म्हणून देण्यात आली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.3 टक्के घसरणीसह 14.33 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 18.4 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 22 टक्के घसरले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 27 January 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x