22 November 2024 5:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Olectra Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्सबाबत मोठी अपडेट, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, फायदा घ्यावा का?

Olectra Share Price

Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या इलेक्ट्रिक बस उत्पादन कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 78 टक्के वाढीसह 27.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 15.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 33.3 टक्के वाढीसह 342.1 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 256.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर तिमाहीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीचा EBITDA 40.6 टक्के वाढीसह 48.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 34.7 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आणि कंपनीचा EBITDA मार्जिन 14.2 टक्के वाढला आहे. आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 1,714.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1719.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर हा स्टॉक 1699.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 11 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,808.50 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. मागील वर्षी 23 फेब्रुवारी रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 375 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला इलेक्ट्रिक बसेसच्या डिलिव्हरीसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यासह कंपनीने हायड्रोजन बसची निर्मिती करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीसोबत भागीदारी देखील केली आहे. याशिवाय कर्नाटक सरकारनेही कंपनीला काही बसेसचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे.

नुकताच ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या एमडीनी माहिती दिली की, कंपनीकडे सध्या 9,000 पेक्षा जास्त बसेसची ऑर्डर आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी आपले नवीन उत्पादन केंद्र जुलै 2024 पासून कार्यान्वित करणार आहे. सुरुवातीला या उत्पादन केंद्राची क्षमता 5,000 बसची असेल. नंतर हे प्रमाण 10,000 बसेसपर्यंत वाढवले जाईल.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक बस बनवते. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्कसाठी उपयोगी असणारे सिलिकॉन रबर, कंपोजिट इन्सुलेटर बनवणारी भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Share Price NSE Live 29 January 2024.

हॅशटॅग्स

Olectra Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x