23 November 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Rathi Steel Share Price | टाटा स्टील पेक्षा भारी! किंमत 45 रुपये, राठी स्टील अँड पॉवर शेअरने 6 महिन्यात 1246% परतावा दिला

Rathi Steel Share Price

Rathi Steel Share Price | राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1246 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 जुलै 2023 रोजी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 44.44 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील 6 महिने 22 दिवसांत राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 1246.66 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 45.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर तुम्ही जुलै 2023 या महिन्यात राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.3 रुपये किमतीवर असताना 1 लाख रुपये लावून खरेदी केले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13.46 लाख रुपये झाले असते. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 25 जानेवारी रोजी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 44.44 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज पुन्हा एकदा या स्टॉकने नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

एका महिन्यापूर्वी ज्या लोकांनी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 53.55 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 139.13 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2023 पर्यंत राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 51.47 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 48.53 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये राठी स्टील आणि पॉवर लिमिटेड कंपनीने 726.55 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीने 12 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. नुकताच कंपनीच्या संचालक मंडळाने 3,55,70,522 प्रेफरंस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 10 फेब्रुवारी 2024 रोजी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rathi Steel Share Price NSE Live 29 January 2024.

हॅशटॅग्स

Rathi Steel Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x