SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअरने 1 दिवसात 15 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी थोडी नफा वसुली केली आहे. सोमवारी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 134.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला गुजरातमधून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के घसरणीसह 128.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एसजेव्हीएन कंपनीला नुकताच 550 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांना गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड कंपनीने 100 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे मूल्य 550 कोटी रुपये आहे. या नवीन कॉन्ट्रॅक्टची प्राप्ती झाल्यानंतर एसजेव्हीएन कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 59,872 मेगावॅट झाला आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 120.96 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र नवीन कॉन्ट्रॅक्टची बातमी येताच शेअरमध्ये अफाट खरेदी सुरू झाली. आणि काही क्षणांत शेअर्सची किंमत 134 रुपये किमतीवर पोहचली होती. मागील एका महिन्यात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे.
एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील काळात एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकमध्ये 125 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीच्या काळात 148 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. पंतप्रधान मोदींनी मागील आठवड्यात 1 कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्याची घोषणा केली होती. या योजनेचा फायदा एसजेव्हीएन सारख्या कंपन्यांना मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SJVN Share Price NSE Live 30 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC