22 November 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Yes Bank Share Price | तेजीतील येस बँक शेअरमध्ये पुन्हा घसरगुंडी मालिका, नेमकं कारण काय? तपशील जाणून घ्या

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | 29 जानेवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स तेजीत ओपन झाले होते, मात्र काही वेळात शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. डिसेंबर 2023 तिमाहीत येस बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. तरी देखील शेअर जबरदस्त आर्थिक निकालाच्या बातमीला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकला नाही.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 25.38 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र नंतर हा स्टॉक 2.6 टक्क्यांच्या घसरणीसह 24.25 रुपये किमतीवर आला होता. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 23.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

येस बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत 231.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 51.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 349.7 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच एनपीए 2 टक्के नोंदवला गेला आहे. तर निव्वळ NPA मागील वर्षीच्या 1.0 टक्क्यांच्या तुलनेत 0.9 टक्केवर आला आहे.

येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 2.3 टक्के वाढीसह 2,016.8 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 70897.28 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षभरात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या बँकेच्या शेअर्सची किंमत 46 टक्के वाढली आहे. येस बँकेचे संपूर्ण 100 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणुकदारांनी धारण केले आहे. येस बँकेच्या शेअरची अप्पर सर्किट लिमिट 20 टक्के वाढीसह 29.85 रुपये आहे. तर लोअर सर्किट लिमिट 20 टक्के घसरणीसह 19.91 रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 30 January 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x