26 November 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 10 कोटी रुपये परतावा हवा असल्यास किती मासिक SIP करावी लागेल, फायद्याचे बेसिक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची
x

Suzlon Share Price | शेअरची किंमत 45 रुपये! 1 वर्षात 400% परतावा देणारा सुझलॉन शेअर पुन्हा तेजीत येणार, नेमकं कारण?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन प्रदाता कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.7 टक्के वाढीसह 44.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीला एव्हरेन कंपनी, एबीसी क्लीनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे 642 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. एव्हरेन कंपनी भारतातील ब्रुकफील्ड आणि ॲक्सिस एनर्जी यांनी स्थापन केलेला एक संयुक्त उपक्रम आहे. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.42 टक्के वाढीसह 45.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ते आंध्र प्रदेश राज्यात हायब्रिड लॅटिस ट्यूबलर टॉवर आणि 214 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करण्याचे काम पूर्ण करणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “सुझलॉन एनर्जी कंपनी भारतील अक्षय ऊर्जा उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी आणि हरित ऊर्जा क्षेत्राला मजबूत करण्यासाठी एव्हरेनसोबत भागीदारी करण्यास वचनबद्ध आहे.”

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 135 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 18 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 8 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 45.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60,463.22 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 31 January 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x